AHMEDNAGAR DISTRICT SECONDARY TEACHER'S CO.OP. CREDIT SOCIETY LTD., AHMEDNAGAR

 सभासदांकरिता सुचना :

· संस्थेच्या सभासदाचा फॉर्म भरुन देताना संस्थेच्या कॅलेंडरमध्ये नमूद केलेल्या आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रती सोबत जोडाव्यात. अर्जात खाडाखोड असल्यास अर्ज स्विकारला जाणार नाही.

· कोणतेही कर्ज घेताना कर्ज अर्ज स्वहस्ताक्षरात प्रॉमिसरी नोटसह पूर्ण भरलेला असावा. त्यावर जामिनदार, साक्षीदारांच्या सहया, रेव्हेन्यू स्टॅंम्प सोबत जामिनदारांच्या सहया असलेला स्टॅंप पेपर जोडल्याशिवाय अधिकृत पगाराचा दाखला असल्याशिवाय कर्ज मंजूर होणार नाही याची नोंद घ्यावी-

 

· कर्ज मंजुरीनंतर चेक घेताना आपली मागील बाकी, शेअर्स, ठेव, कपात होऊन मिळालेला चेक बरोबर आहे याची खात्री करा, त्याकरिता संबंधिताकडून जमा ट्रान्सफर पावतीची मागणी करा.

 

· दोन पेक्षा जास्त सभासदांना जामिनदार जामिनदार होऊ नका. एकदा घेतलेला जामिनदार कायम ठेवा, त्यात बदल करु नका. काही कारणास्तव बदल हवा असल्यास जामिन बदल अर्ज संस्थेकडे पाठवा. त्यानंतरच त्यांच्या सहया कर्जाकरिता घ्या.

 

· आपल्या जामिनदाराची कर्जाची वसुली नियमित दरमहा होते की नाही याकडे लक्ष असू द्या.

 

· जामिनदार थकबाकीदार होणार नाही याची काळजी घ्या.

 

· कर्जदार थकबाकीदार झाल्यास जामिनदाराकडून कर्जवसुली होते हे लक्षात घेऊन जामिनदार होताना काळजी घ्या.

 

· संस्थेने पाठविलेल्या वसुली बिलाप्रमाणे वसुली पाठवावी. त्यात फेरफार करु नका. वसुली बिलाप्रमाणे वसुली नसल्यास सदरचे बिल अनामत खाती जमा करण्यात येईल याची नोंद घा.

 

· कर्ज घेतांना आपणास दिलेला समान हप्ता कायम ठेवण्यात येईल त्यात बदल करता येणार नाही. सेवानिवृत्ती विचारात घेऊनच कर्जवसुलीचा हप्ता आकारला जातो. परस्पर हप्ता तहकुबी करता येणार नाही.

 

· कर्जाच्या ठेवीच्या मिळणाऱ्या रकमेचा धनादेश क्रॉस ( अकौंट पे ) चेक दिला जाईल याची नोंद घ्या.

 

· कर्ज घेताना दुस-या संस्थेचे सभासद असल्यास त्या संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र कर्जरोख्याबरोबर सादर करा.

 

· कर्ज घेताना थकबाकीदार जामिनदाराची सही चालणार नाही.

 

· संस्थेच्या कोणत्याही शाखेत रोख भरणा केल्यास संस्थेची पक्की जमा पावती संबंधितांकडून घेऊन सदरचा भरणा आपल्या खाती जमा झाल्याची खात्री करा. आपले खाते पासबुक नियमित भरुन घ्या. त्यात झालेले जमा नावे व्यवहार नियमित तपासून पहा.

 

· आपली बदली झाल्यानंतर बदली शाळेचा पत्ता त्वरीत संस्थेस कळविण्याची जबाबदारी आपली आहे याची काळजी घ्या.

 

· आपल्या नावात वारसाच्या नावात बदल झाल्यास त्वरीत संस्थेस कळविण्याची काळजी घ्या.

 

· आपली दरमहा वर्गणी सलग तीन महिने संस्थेकडे जमा झाल्यास संस्थेच्या उपविधीनुसार आपले सभासदत्व कमी होते. त्याकरिता नियमित दरमहा वर्गणी कपात होऊ द्या.

 

· विद्यालयाच्या सभासदांची पगाराची एकत्रित माहिती प्रत्येक जुलै महिन्यात संस्थेला देऊन आपली वर्गणीची कपात नियमाप्रमाणे आहे की नाही याची खात्री करा.

 

· अहवाल वर्षात सभासदांना विशेष प्राविण्याबद्दल पुरस्कार मिळाले असतील तर त्याची माहिती संस्थेस 30 एप्रिलपुर्वी लेखी पत्राने कळवा.

 

· सभासदांना पुरोगामी कन्यादान योजनेकरिता विहीत नमुन्यातील अर्ज विवाहापूर्वी संस्थेकडे 15 दिवस अगोदर पाठविणे आवश्यक आहे.

 

 

तरी कृपया सभासदांनी वरील सुचनांची नोंद घेऊन संस्थेचे कामकाज सुरळीत होईल याकामी सहकार्याची अपेक्षा!

 

सेक्रेटरी                 व्हा. चेअरमन                 चेअरम              कार्यकारी संचालक मंडळ

Head Office -
Madhyamik Shikshak Bhavan, Juna Mangalwar Bajar,
Ahmednagar. Ph.- 0241-2345331, 9922431582